Rakhi Sawant : पोलिसांच्या चौकशीनंतर राखीला भावना अनावर… | पुढारी

Rakhi Sawant : पोलिसांच्या चौकशीनंतर राखीला भावना अनावर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : शर्लिन चोप्रा प्रकरणात राखी सावंतची आंबोली पोलिसांनी अनेक तास चौकशी केली. चौकशीनंतर राखी तिचा पती अदिल दुरानीसोबत पोलिस स्टेशनमधून बाहेर आली, तेव्हा राखीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली.

राखी अदिल दुरानीशी लग्न केल्यामुळे चर्चेत आलीय. दुसराकीडे तिची आई रुग्णालयात दाखल आहे. दरम्यान, शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर राखी सावंतला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण चौकशी केल्यानंतर तिला सोडून देण्यात आलं. आता राखीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

चौकशीनंतर ती अदिल दुरानीसोबत पोलिस स्टेशनच्या बाहेर आली. आपल्या आईला भेटण्यासाठी ती रुग्णालयात पोहोचली होती. त्यानंतर राखीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या. राखीने पोस्टमध्ये लिहिलं-‘जगातील सर्वात किंमती अश्रू आहेत. यात एक टक्का पाणी आणि ९ टक्के फीलिंग्ज आहेत. कुणाला दु:ख पोहोचवण्याआधी दोनवेळा विचार करा.’ यासोबत ती कॅप्शनमध्ये लिहिते-सत्य.

शर्लिनने काही महिन्यांआधी राखी सावंत विरोधात केस दाखल केली होती. शर्लिनचं म्हणणं होतं की, राखीने तिचे व्हिडिओ आणि फोटोंना सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. याच आधारावर राखीला १९ जानेवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं. रिपोर्टनुसार, पोलिसांचं म्हणणं होतं की, राखीने चौकशीत सहकार्य केलं आणि आपला मोबाईलदेखील जमा केला होता. चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आलं.

Back to top button