Mahesh Bhatt Surgery: महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, आलियाच्या भावाने दिली माहिती | पुढारी

Mahesh Bhatt Surgery: महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, आलियाच्या भावाने दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्टचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली. महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्टने त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिलीय. (Mahesh Bhatt Surgery) महेश भट्ट यांची तब्येत मागील काही दिवसांपासून ठिक नव्हती. रिपोर्टनुसार, महेश भट्ट यांची एंजियोप्लास्टी करण्यात आली आहे. (Mahesh Bhatt Surgery)

रिपोर्टनुसार, मागील महिन्यात महेश भट्ट यांनी आपल्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यांना लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. राहुल भट्टने या माहितीची पुष्टी करताना म्हटले की, ‘त्याच्या वडिलांना या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हार्ट सर्जरीनंतर ते ठिक आहेत आणि रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन घरी आले आहेत. राहुल शेवटी म्हणाला, ‘अंत भला तो सब भला, वह ठीक हो रहे हैं…’

महेश यांनी हिंदी सिनेमा जगतात एकापेक्षा एक चित्रपट निर्मिती केलीय. महेश भट्ट (Mahesh Bhatt Movies) यांनी वयाच्या २६ व्या वर्षी पहिला चित्रपट ‘मंजिले और भी हैं’ दिग्दर्शित केला होता. यानंतर त्यांनी सारांश, आशिकी, जहर, जिस्म यासारखे चित्रपट आणले. त्याचसोबत महेश भट्ट यांनी राज दुश्मन, फुटपाथ यासारख्या चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिले आहेत.

Back to top button