Rakhi Sawant : राखीच्या मिसकॅरेजच्या वृत्तावर आदिल खानने सोडले मौन | पुढारी

Rakhi Sawant : राखीच्या मिसकॅरेजच्या वृत्तावर आदिल खानने सोडले मौन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ड्रामा क्वीन राखी सावंत ( Rakhi Sawant ) गेल्या काही दिवसांपासून आदिल खानसोबतचा निकाह केल्याने चर्चेत आली आहे. दरम्यान, तिच्या मिसकॅरेजच्या बातम्या येऊन धडकल्या. बिग बॉस घरात असताना राखीने प्रेंग्नेट असून माझा गर्भपात केला असल्याचे सांगितले होते. परंतु, यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. या सर्व गोष्टींदरम्यान राखीने अचानक आदिलसोबत निकाह (लग्न) केल्याचा खुलासा केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.  दुसरीकडे, तिच्या आईच्या कॅन्सरच्या आजारामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता तिचा पती आदिल खानने राखीच्या मिसकॅरेजबद्दल मौन सोडले आहे.

आदिलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून राखीच्या ( Rakhi Sawant ) मिसकॅरेजच्या वृत्ताला पूर्णविराम देत हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. असे काहीही घडलेले नाही. खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत, असे त्याने नमूद केले. आदिलने त्याच्या आणि राखीच्या लग्नाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘फेक न्यूज. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, अशा विषयांवर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका.’ यासोबत दोघांनी एक व्हिडिओ शेअर करून राखी प्रेंग्नट नसून तिचा गर्भपात झाला नसल्याचं म्हटलं आहे.

याआधी राखीने विरल भयानीच्या इन्स्टाग्रामवरून प्रेंग्नेट असल्याचा खुलासा केला होता. यात तिने बिग बॉसच्या घरातून प्रेंग्नेट असल्याची माहिती मी दिली होती. परंतु, यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता असेही तिने म्हटलं होतं.

सात महिन्यांपुर्वी राखीने आदिल खानसोबत निकाह ( लग्न ) केला आहे. परंतु, आदिलने राखीचा पत्नी म्हणून स्वीकार केला नव्हता, असेही वृत्त समोर आले होते. त्याशिवाय, त्याच्यासाठी ‘फातिमा खान’ असेही तिने आपले नाव बदलेल्याची माहिती समोर आली होती.  दरम्यान, आदिलचे बिग बॉस मराठीच्या घरातील एका स्पर्धकासोबत अफेअर सुरू आहे आणि याबाबतचे काही पुरावे असल्याचेही तिने त्यावेळी स्पष्ट केले होते.

याच दरम्यान राखीने जोरजोरात रडून याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. पण, बॉलिवूड अभिनेता सलमान खानेदेखील मध्यस्थी केल्यानंतर आदिलने निकाह केल्याचे कबूल केल्याचीही माहिती सममोर आली. यानंतर राखीने सलमानचे आभार मानले होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button