Harnaaz Sandhu : जाडजूड झाल्यानंतर ट्रोल झाली हरनाज संधू(Photos) | पुढारी

Harnaaz Sandhu : जाडजूड झाल्यानंतर ट्रोल झाली हरनाज संधू(Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण विश्वात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या हरनाज संधूने आपल्या ड्रेसमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिस युनिव्हर्स २०२२ च्या फिनालेमध्ये स्टेजवर माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू (Harnaaz Sandhu) उपस्थित होती. यावेळी तिने स्वत:ला प्रेझेंट करत अमेरिकेच्या गॅब्रिएलला मिस युनिव्हर्सचा मुकूट परिधान केला होता. यावेळी तिने ब्लॅक आणि सिल्व्हर कलरचा सुंदर गाऊन परिधान केला होता. हा गाऊन साईं शिंदेने डिझाईन केला होता. (Harnaaz Sandhu)

मिस युनिव्हर्स २०२२ च्या फिनालेमध्ये हरनाज संधूने यावेळी आर बोनी गेब्रियलला आपल्या हस्ते मुकूट घातला होता. कार्यक्रमाच्या दरम्यान हरनाज मिस युनिव्हर्सच्या स्टेजवर अखेरचा वॉक करताना दिसली. अखेरच्या वॉकच्या दरम्यान, हरनाज यावेळी खूप भावूकदेखील झालेली दिसली. ती गंभीर आजाराने झुंजत असतानादेखील स्टेजवर आली, ज्यामुळे तिचे वाढलेले वजन पाहून तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

मिस युनिव्हर्सचा किताब अमेरिकेच्या बोनी गेब्रियलने आपल्या नावे केला. २८ वर्षीय गेब्रियलला मुकूट परिधान करण्यासाठी भारताची हरनाज संधू तेथे पोहोचली होती. या सोहळ्यातील फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये हरनाजचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हरनाजवरून नजर हटवणे कटिण झाले होते. तिने परिधान केलेला गाऊन हेवी फ्लो मटेरियलने डिझाईन केला होता. हरनाज वेवी हेअरस्टाईलमध्ये खूप सुंदरदिसत होती. हरजानच्या स्मोकी आईज आणि ब्रॉन्ज मेकअप तिला ग्लॅमरस लूक देत होते.

लोकांनी केलं ट्रोल

यादरम्यान खूप लोकांनी हरनाजला तिच्या वाढत्या वजनावरून ट्रोल केलं. याआधीही एका कार्यक्रमात हरनाज संधू ट्रोल झाली होती. ”मी त्या लोकांपैकी आहे, जे लोक मी दिसायला बारीक आहे म्हणून मला टोमणे मारायचे. आतातेच लोक मला जीड म्हणताहेत. माझ्या वाढत्या वजनाला माझा आजार कारणीभूत आहे. याबद्दल कुणलाही माहिती नाही. मी गव्हाच्या पीठाचे पदार्थसारखे अनेक पदार्थ खाऊ शकत नाही. या आजारामुळे माझं वजन सतत्याने वाढत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

Back to top button