Pathaan Controversy : 'बेशर्म रंग' वादावर शाहरूखची पहिली प्रतिक्रिया... | पुढारी

Pathaan Controversy : 'बेशर्म रंग' वादावर शाहरूखची पहिली प्रतिक्रिया...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरूख खान चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आगामी ‘पठान’ चित्रपट घेऊन येत आहे. यामुळे शाहरूखच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून वादाची ठिणगी पडली होती. गाण्यातील तिच्या वेशभूषेवर अनेकांनी आक्षेप घेतला गेला आणि शेवटी चित्रपटातील काही सीनला कात्री लावण्यात आली. यानंतर आता शाहरूख खानने पहिल्यांदा या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ( Pathaan Controversy )

यशराज फिल्मने नुकतेच अभिनेता शाहरुख खानसोबतच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी किंग खानला चित्रपटातील को-स्टार दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम आणि ‘बेशर्म रंग’ गाण्यातील वादावरील अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी शाहरूखने ‘बेशर्म रंग’ गाण्यासाठी दीपिकाच्या उंचीच्या व्यक्तीची आवश्यकता होती. तिच्या उंचीची व्यक्ती असती तर सर्व काही मॅच झाले असते हे तुम्हाला माहित आहे. मात्र, दीपिकासोबत या गाण्यात ॲक्शन करणे खूपच अवघड आहे. यासारखी भूमिका दीपिकाच साकारू शकते, असे त्याने म्हटले.

यानंतर शाहरूखने मुख्य भूमिकेविषयी सांगितले की, ‘मी ३२ वर्षांपूर्वी ॲक्शन हिरो बनण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीत आलो होतो, परंतु, माझा अंदाज चुकला आणि मला रोमँटिक हिरो बनवण्यात आले. माझे फक्त अॅक्शन हिरो बनण्याचे स्वप्न होते ते आता पूर्ण झाले आहे. तर मला डीडीएलजे ( Dilwale Dulhania Le Jayenge ) चित्रपटातील राहुल आणि राज जोडी आणि चित्रपट खूपच आवडला.’ असेही तो यावेळी म्हणाला.

शाहरूखच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. चित्रपटाचे पहिले गाणे ‘बेशर्म रंग’ रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. गाणे रिलीज होताच चाहत्यांच्या एका वर्गाने दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर खूपच आक्षेप घेत खरेखोटे सुनावले होते. या गाण्यात शाहरुख आणि दीपिका स्पेनच्या बीचवर रोमान्स करताना दिसले आहेत. ( Pathaan Controversy )

हेही वाचलंत का? 

Back to top button