बाॉलिवूड अभिनेते टिकू तलसानिया यांची मराठी चित्रपटात एन्ट्री | पुढारी

बाॉलिवूड अभिनेते टिकू तलसानिया यांची मराठी चित्रपटात एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते टिकू तलसानिया “झोलमॉल”या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत. “झोलमॉल” चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुबेर करत आहेत. नागपूरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. नागपूरच्या पद्मा फिल्म्स प्रॉडक्शनची पहिलीच निर्मिती असून हरीषकुमार बाली हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शनाचा तीस-चाळीस वर्षांचा अनुभव असलेले राज कुबेर यांनी आतापर्यंत अनेक हिंदी-मराठी चित्रपटांसाठी सह दिग्दर्शक-दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. तर राज काझी यांनी चित्रपटाचं लेखन केलं असून संवाद विनायक पुरुषोत्तम कदम यांनी लिहिले आहेत.

“झोलमॉल” या नावावरूनच हा चित्रपट अत्रंगी, धमाल कथेवर आधारित असल्याचा अंदाज सहज बांधता येतो. टिकू तलसानिया यांच्यासोबत अभिनेते भरत जाधव, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे अभिनेत्री प्रार्थना बेहरे, हेमांगी कवी, स्मिता गोंदकर, अश्विनी कुलकर्णी अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत. बी. लक्ष्मण यांचे छायांकन असून चैत्राली डोंगरे वेशभूषाकार, कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम पाहणार आहे.

टिकू तलसानिया यांना आपण अनेक हिंदी मालिका, चित्रपटांतून पाहिलं आहे. विनोदाचं टायमिंग असलेले उत्तम अभिनेता म्हणून टिकू तलसानिया यांची खास ओळख आहे. आता “झोलमॉल”मधील त्यांच्या अभिनयानं चित्रपटाला चार चाँद लागणार यात शंका नाही.

Back to top button