पोस्ट ऑफीस उघडं आहे: मालिकेत दिसणार मकरंद अनासपुरे-दिलीप घारे गुरुशिष्याची जोडी

मकरंद अनासपुरे-दिलीप घारे
मकरंद अनासपुरे-दिलीप घारे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठीवर एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे…', असं या मालिकेचं नाव आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे…' या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातले विनोदी अभिनेते या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. सर्वांचे आवडते आणि लाडके मकरंद अनासपुरेही या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

मालिकेत एक विशिष्ट जोडी पाहायला मिळणार आहे. मकरंद अनासपुरे आणि दिलीप घारे ही गुरुशिष्यांची जोडी ह्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हे दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. 'पोस्ट ऑफिस उघडं आहे…' या मालिकेत दिलीप घारे हे मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांचा भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. दिलीप घारे हे माझे अभिनयातले गुरू आहेत, असं मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं.

अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिलीप घरे यांनी मकरंद अनासपुरे यांना अभिनय शिकवला आणि आता हे दोघे दिग्गज आपल्याला एकाच मालिकेत दिसणार आहेत. त्यांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. वडील आणि मुलगा यांची ही मराठवाड्यातली सुंदर जोडी आपल्याला पाहता येणार आहे. याबद्दल मकरंद अनासपुरेही उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news