Picolo Movie : ‘पिकोलो’चा ट्रेलर रिलीज 

पिकोलो चित्रपट
पिकोलो चित्रपट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणीवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मिती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतील 'पिकोलो' हा चित्रपट २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी, या चित्रपटाचा ट्रेलर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लाँच करण्‍यात आला. या वेळी दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग, मध्यवर्ती भूमिकेतले कलाकार प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार उपस्थित होते. फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा. लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित 'पिकोलो' हा संगीतमय चित्रपट आहे. राजेश मुद्दापूर यांनी याची निर्मिती केली आहे.

'पिकोलो'मध्ये ही संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीत साधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? आणि त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे 'पिकोलो' मध्ये पहायला मिळणार आहे.

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत 'पिकोलो' चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.  कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची आहे. कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news