शाहरुख खानची पहिली गर्लफ्रेंड कोण?

शाहरुख खानची पहिली गर्लफ्रेंड कोण?
Published on
Updated on

एखाद्या हिरोने आपण पहिल्याच गर्लफ्रेंडसोबत लग्न केले असे सांगितले तर चाहते त्यावर सहजी विश्वास ठेवत नाहीत. कारण, बॉलीवूडमध्ये अफेअरची कमतरता नाही. तेथील नातेसंबंधांची खुमासदार चर्चा सातत्याने होत असते. अनेकदा अशी चर्चा केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी घडवून आणली जाते. 'पठाण' चित्रपटामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या शाहरुख खानला याच विषयावर प्रश्न विचारण्यात आला आणि त्याने त्याला लगेच उत्तरही दिले. 'आस्क एसआरके' या कार्यक्रमात तो आपल्या चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगतो. यात एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला की, तुझी पहिली गर्लफ्रेंड कोण होती? यावर क्षणाचाही विलंब न करता शाहरुख म्हणाला, माझी बायको गौरी. त्याच्या या उत्तराला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिली. 1991मध्ये गौरी व शाहरुख विवाहबंधनात अडकले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news