Rajamouli-Steven Spielberg : ग्रेट भेट! राजामौली-किरावनींनी घेतली स्टीवन स्पीलबर्ग यांची भेट | पुढारी

Rajamouli-Steven Spielberg : ग्रेट भेट! राजामौली-किरावनींनी घेतली स्टीवन स्पीलबर्ग यांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : आरआरआरचे संगीतकार एमएम किरावनी ज्यांनी ८० व्या गोल्डन ग्लोब ॲवार्ड्समध्ये नाटू नाटू गाण्यासाठी गोल्डन ग्लोब जिंकला. त्यांनी “गॉड ऑफ मुव्हीज” स्टीवन स्पीलबर्गसोबत एक फोटो शेअर केला आहे. (Rajamouli-Steven Spielberg) शनिवारी सकाळी, किरावनी यांनी स्पीलबर्गसोबतचे २ फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये एस एस राजामौलीदेखील दिसतात. (Rajamouli-Steven Spielberg)

फोटो शेअर करत एम एम किरावनी यांनी लिहिलंय-“चित्रपटाच्या देवाला भेटण्याचे भाग्य मिळाले. मी त्यांना म्हणालो की, मला ड्यूएलसह त्यांचे चित्रपट खूप आवडतात.” एका अन्य पोस्टमध्ये, त्यांनी ट्विट केलं आहे, “आणि मला विश्वास झाला नाही, जेव्हा ते म्हणाले की, त्यांना नाटू नाटू गाणे आवडते.”

स्पीलबर्ग अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. ज्यामध्ये तीन ऑस्कर (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी दोन) पुरस्कारांचा समावेश आहे. एस एस राजामौलीच्या आरआरआर चित्रपटातील हिट गाणे नाटू नाटूने ८० व्या गोल्डन ग्लोब्सध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा (मोशन पिक्चर) पुरस्कार जिंकला.

Back to top button