‘नाटू नाटू’च्या निर्मितीसाठी लागले तब्बल एकोणीस महिने

natu natu song
natu natu song

सध्या जगभरात 'आरआरआर' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याची जोरदार चर्चा आहे. या गाण्याला नुकताच ओरिजिनल साँग मोशन पिक्चर श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. या गाण्याला सुरावट एम. एम. किरवाणी यांनी दिली असून चंद्रबोस यांनी त्याचे लेखन केले आहे. चंद्रबोस यांनी 17 जानेवारी 2020 पासून या गाण्याची निर्मिती करायला सुरुवात केली. गाण्याचे 90 टक्के काम दोन दिवसांत पूर्ण झाले. तथापि, नंतर शब्दांचा खेळ सुरू झाला आणि त्यामुळे संपूर्ण गाणे तयार होण्यासाठी 19 महिने लागले. या गाण्याचे शूटिंग युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच 'आरआरआर' चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरून देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news