तुमची मुलगी काय करते? : भोसले किलवर पकडला जाणार का? मालिकेत दिसणार थरार

tumchi mulgi kay karte tv serial
tumchi mulgi kay karte tv serial
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'तुमची मुलगी काय करते?'. चित्तथरारक अशा या मालिकेत अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळत आहेत. किलवरचा शोध घेताघेता ती रंजक वळणावर येऊन पोचली आहे. आता भोसले किलवरचा थरारक शोध घेणार आहे आणि खरा किलवर जगासमोर येणार आहे. यासोबतच आजवर मालिकेत निरनिराळे रंजक भाग पाहायला मिळाले. मालिकेतली उत्कंठा कायम राखत गुप्तता पाळण्यात टीम यशस्वी ठरली. त्यामुळेच मालिकेतील रंजकता कायम राहिली. आता मालिका शेवटपर्यंत येऊन पोचली आहे आणि हा थरारक आठवडा पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

भोसले किलवरला कशा प्रकारे पकडेल, हे आपल्याला पाहायला मिळेल. या मालिकेचे बंगाली भाषेत डबिंग झाले आहे. प्रेक्षकांच्या उत्साहात भर पडली आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट ठरणार आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेची लोकप्रियता यातूनच आपल्याला समजते आहे.

'तुमची मुलगी काय करते?' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. या आठवड्यात ती शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारीला रविवारी १० वाजता हा महाएपिसोड पाहायला मिळणार आहे.

'तुमची मुलगी काय करते?' मालिकेतील थरार १५ जानेवारीला पाहायला मिळणार.

अधिक वाचा- 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news