

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा ; उमरखेड तालुक्यातील पोफळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळअसोली शेतशिवारातील सोयाबीनच्या कुटारात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत गुरुवारी (दि.५) आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेत पोलिसांनी तत्काळ तपास यंत्रणा कामी लावत या प्रकरणाचा उलगडा केला. शारीरिक संबंधास विरोध करत असल्याने पत्नीचा खून करून तिला जाळून टाकल्याची कबुली आरोपी पतीने शुक्रवारी (दि.६) पोलिसांना दिली. (Yavatmal Crime)