HBD Deepika: अभिनेता ते क्रिकेटरपर्यंत ‘यांच्या’सोबत जोडलं दीपिकाचं नाव | पुढारी

HBD Deepika: अभिनेता ते क्रिकेटरपर्यंत 'यांच्या'सोबत जोडलं दीपिकाचं नाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण (HBD Deepika Padukone) ५ जानेवारीला आपला वाढदिवस साजरा करत आहे. तिने तिच्या १५ वर्षांच्या अभिनय करिअरमध्ये एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. तिचा पहिला चित्रपट ‘ओम शांती ओम’ लोकांच्या मनावर रुंजी घालून गेला. दीपिका आपल्या दमदार अभिनयासोबत सौंदर्य आणि ड्रेसिंग सेन्सने देखील फॅन्सना घायाळ करते. ती प्रोफेशनल लाईफवरूनही चर्चेत राहते. त्याचसोबत ती खासगी आयुष्यातही खूप चर्चेत राहते. दीपिकाने रणवीर सिंहला आपला आयुष्यभराचा साथीदार निवडलाय. पण, तुम्हाला माहितीये का रणवीरच्या आधी तिचे नाव अनेकांशी जोडले गेले. यामध्ये अभिनेते ते क्रिकेटरपर्यंतची नावे आहेत. (HBD Deepika Padukone)

निहार पांड्या

ॲक्टिंग स्कूलवेळी दीपिका ही निहार पांड्याची गर्लफ्रेंड होती. निहार दीपिकाचा अगदी सुरुवातीपासून बॉयफ्रेंड होता. पण, काही काळानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

एम एस धोनी

भारतीय क्रिकेटर आणि इंडियन टीमचा माजी कॅप्टन एम एस धोनीसोबत दीपिका पादुकोणचं नाव चर्चिलं गेलं. अनेक इवेंटमध्ये दीपिका आणि धोनीला एकत्र पाहिलं जात होतं. परंतु, दोघांनी आपल्या रिलेशनविषयी कधीच खुलासा केला नाही.

सिद्धार्थ माल्या

विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यादेखील दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशीपमध्ये होता. या दोघांच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. करिअरच्या सुरूवातीला दीपिका नेहमी सिद्धार्थसोबत स्पॉट होत असे. दीपिका – सिद्धार्थ माल्‍या यांचं नातं दोन वर्षांपर्यंत चाललं.

या दरम्यान २०११ मध्ये आयपीएल मॅचदरम्यान दोघे एकत्र दिसले. यावेळी सर्वांसमोर सिद्धार्थ – दीपिकाने लिपलॉक केलं होतं. दोघांचा ब्रेकअप सर्वांसाठी धक्कादायक होता. दीपिकाने एका मुलाखतीत म्हटलं होतं- मी सिद्धार्थसोबतचं नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण, नंतर त्याच्या वागणुकीत बदल झाला. जेव्हा आम्ही शेवटी डिनर डेटवर गेलो होता. तेव्हा सर्वकाही ठिक नव्हतं. आमच्या नात्यात सर्वकाही बिनसलं होतं.’

रणबीर कपूर

रणवीर सिंहच्या आधी दीपिकाच्या आयुष्यात अभिनेता रणबीर कपूर होता. दीपिकाने एका मुलाखतीत नाव न घेता सांगितलं होतं की, त्याला दुसऱ्या एका तरुणीसोबत रंगेहात पकडलं होतं. दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचा ब्रेकअप झाला. दोघे सहा वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

युवराज सिंह

२०१७ मध्ये युवराज सिंहचे करिअर उंचीवर होते. T20 वर्ल्ड कप दरम्यान त्याने दमदार कामगिरी करत वाहव्वा मिळवली होती. दीपिका युवराज सिंहचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. परंतु, दोघांच्या नात्याचा खुलासा कधीच झाला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

Back to top button