ब्रिटनमध्ये १८ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणित सक्तीचे; पंतप्रधान ऋषी सुनक लवकरच करणार घोषणा | पुढारी

ब्रिटनमध्ये १८ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणित सक्तीचे; पंतप्रधान ऋषी सुनक लवकरच करणार घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनमध्ये १८ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणित शिकणे अनिवार्य करण्यात येणार आहे. पंतप्रधान ऋषी सुनक लवकरच याची घोषणा करतील. त्यांना ब्रिटनमध्ये जगातील सर्वोत्तम शिक्षणपद्धती हवी आहे, त्यामुळे त्यांना शिक्षण धोरणात बदल करायचा आहे. आगामी काळात कौशल्य शिक्षणावर भर दिला जाईल, त्यासाठी तरुणांनी सज्ज राहायला हवे, असे त्यांचे मत आहे.

ब्रिटनमध्ये १६ ते १९ वयोगटातील केवळ निम्मे विद्यार्थी गणित शिकतात. अंदाजे ८० लाख प्रौढ व्यक्तीचे गणिताचे ज्ञान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांएवढे आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख सुनक आपल्या भाषणात करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांसह गणित हा विषय अनिवार्य करण्याची सुनक यांची योजना आहे. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांसह गणित अनिवार्य करावे. त्यांना ज्या काही संधी मिळाल्या आहेत, त्या त्यांच्या शिक्षणामुळे आहेत. आगामी काळात प्रत्येक कामात डेटा आणि आकडेवारीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे मुलांमध्ये विश्लेषणात्मक कौशल्ये असायला हवीत, असे त्यांचे मत आहे.

रिपोर्ट नुसार सुनक यांच्या मते ब्रिटनमधील १६ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांपैकी केवळ निम्मे विद्यार्थी गणित शिकतात. या आकडेवारीमध्ये विज्ञान पाठ्यक्रम आणि जीसीएसई अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

Back to top button