नाशिक : देवादेवांमध्ये तुलना करण्यापेक्षा भक्ती करा - डॉ. नामदेवशास्त्री | पुढारी

नाशिक : देवादेवांमध्ये तुलना करण्यापेक्षा भक्ती करा - डॉ. नामदेवशास्त्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देवादेवांमध्ये तुलना करण्यापेक्षा आपल्याला देव किती समजतो ते महत्त्वाचे आहे. देवाला न्याय, नीती हे तत्त्व अपेक्षित असताना आपण देवाला एका साच्यात बघणे कमी करायला हवे. काळाच्या गतीने पावले टाकत असताना आपण त्या प्रतिदेखील निष्ठा ठेवायला हवी. समाजमाध्यमांद्वारे प्रचार-प्रसार करण्यासाठी अधिकृत माध्यम होणे आवश्यक आहे. निवृत्तिनाथ संस्थान करत असलेले काम स्वागतार्हच आहे, असे प्रतिपादन न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री यांनी केले.

निवृत्तिनाथ संस्थान बोधचिन्ह अनावरण आणि समाजमाध्यमे प्रकाशन सोहळा कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मारुतीबाबा कुऱ्हेकर, डॉ. नामदेव महाराज शास्त्री, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, शिवराम म्हसकर, खासदार हेमंत गोडसे, सचिन पवार, डॉ. रवींद्र सपकाळ, कारभारी चुंभळे, निवृत्ती महाराज संस्थान अध्यक्ष नीलेश गाढवे, ॲड. सोमनाथ घोटेकर उपस्थित होते.

खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी संस्थानच्या उपक्रमास शुभेच्छा देताना मंदिरासाठी आवश्यक ती मदत करत राहण्याचे आश्वासन दिले. संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे यांनी प्रास्ताविकेत संस्थानची माहिती उपस्थिताना दिली. तसेच एमटीडीसीमध्ये निवृत्तिनाथ संस्थानचा उल्लेख करावा, शालेय अभ्यासक्रमात निवृत्तिनाथांचा उल्लेख असावा, त्र्यंबकेश्वरला भाविक ज्योतिर्लिंग म्हणून येतात, मग निवृत्तिनाथ मंदिरात का नाही येत असा सवाल उपस्थित केला. त्यासाठी परिसरात फलके लावले पाहिजे, असेदेखील यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button