पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिताभ बच्चन यांचा १९९८ मध्ये आलेला 'सूर्यवंशम' (soorywansham) हा चित्रपट आजही सिनेरसिकांच्या मनात घर करून आहे. आजही सहकुंटूंब हा चित्रपट छोट्या पडद्यावर पाहिला जातो. या चित्रपटात अभिताभ बच्चन यांनी भानुप्रतापसिंह ठाकूर व हिरा ठाकूर अशी दुहेरी भुमिका निभावली होती. यामध्ये भानुप्रतापसिंह यांचा नातू व हिरा ठाकूर याच्या मुलाची भूमिका बालकलाकार आनंद वर्धन याने साकारली होती. तुम्हाला माहितीये ता आनंद वर्धन आता कसा दिसतो. तो सध्या काय करतो, हे जाणून घ्या. (soorywansham)
आनंद वर्धनचे संपूर्ण नाव पी. बी. एस आनंद वर्धन आहे. त्याने बालकलाकार म्हणून काम केलेल्या सूर्यवंशम चित्रपटाला आता जवळजवळ २० वर्षे पूर्ण झाले आहेत. या चित्रपाटतील बाल कलाकार 'आनंद' (Anand Vardhan) याने २० पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले आहे. 'प्रियराग्लू' या चित्रपटातून त्याने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले होते. हा बालकलाकार आता सुपरस्टारपेक्षा कमी दिसत नाही. तो हँडसम हंक झालाय.
रिपोर्ट्सनुसार, आनंदचे आजोबा पी. बी. श्रीनिवास गायक होते. त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली आहेत. श्रीनिवास यांची इच्छा होती की, त्यांच्या परिवारात कुणीतरी अभिनेता व्हावं. आनंदने आपल्या आजोबांचे स्वप्न पूर्ण केलं.
आनंद आतापर्यंत अनेक बड्या स्टार्ससोबत दिसला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, तो चित्रपट इंडस्ट्रीपासून जवळपास १२ वर्ष दूर आहे. आनंदने सीएमआर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून बीटेक केलं आहे.
हेही वाचा :