दिघी येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

file photo
file photo
Published on
Updated on

पिंपरी : दिघी येथील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. प्रेमकुमार सुखदेव सोळंके (19, मूळ रा. बीड), शिरीष शंकर काळे (40, रा. विश्रांतवाडी, पुणे), ग्राहक वामन तुळशीदास सोळंके (42, रा. आळंदी), सुरेश भिकू निंबाळकर (60, रा. दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गौरव चौहान (24, रा. बोपखेल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक जिजाराम कारभळ यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील अभिषेक लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. लॉज मालक, मॅनेजर यांनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. या छाप्यामध्ये दोन ग्राहकांनादेखील अटक करण्यात आली आहे. एकजण घटनास्थळावरून पळून गेला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच, तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. दिघी पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news