Urfi Javed: उर्फीकडून चित्रा वाघ यांना नववर्षाच्या बोचऱ्या शुभेच्छा, वाचून तर बघा

Urfi Javed-chitra wagh
Urfi Javed-chitra wagh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांचं ट्विटर वॉर सुरू आहे. उर्फीच्या विचित्र फॅशनमुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. दरम्यान, बिभत्स कपडे घालून मुंबईच्या रस्त्यावर फिरणारी चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली. पण, गप्प बसेल ती उर्फी कसली? मॉडल आणि अभिनेत्री उर्फी जावेदने ट्विटरवर एक खट्याळ आणि बोचरी टीका करणारे ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून उर्फीने चित्रा वाघ यांना नववर्षाच्या शुभेच्छा देत काही अपेक्षा (expect) व्यक्त केल्या आहेत. (Urfi Javed)

काय म्हटलंय उर्फी जावेदने?

ट्विटरवर उर्फीने Happy New Year To Everyone Expect Chitra Wagh असे ट्विट केले आहे. याशिवाय तिने काही खट्याळ इमोजी शेअर केल्या आहेत. या ट्विटवरून असे वाटते की, उर्फीला काहीही फरक पडलेला नाही. विशेष म्हणजे, तिच्या या ट्विटमध्ये Expect हा शब्द लक्ष वेधून घेतो. उर्फीने ट्विटच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देत Expect Chitra Wagh असं म्हटलं आहे. यामुळे असा अंदाज लावता येऊ शकेल की, चित्रा वाघ यांच्याकडून कामाच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, जेव्हा उर्फीला समजलं की, चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात कारवाई करण्याची मुंबई पोलिसांकडे मागणी केलीय. तेव्हा तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मेसेज लिहिला. तिने यामध्ये म्हटलं की, मला कुठलाही खटला अथवा वायफळ चर्चा करण्याची इच्छा नाही. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या सदस्यांच्या संपत्तीचा खुलासा कराल तर मीदेखील जेल जाण्याासाठी तयार आहे.

शिवाय, वे‍ळोवेळी तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांवर शोषण वगैरेचा आरोप लागला आहे. तेव्हा चित्रा वाघ त्या महिलांसाठी कधी काही बोलल्या नाहीत.

उर्फीने केला पलटवार

उर्फी जावेदने आपल्या एक अन्य पोस्टमध्ये लिहिलंय, काय हे राजकारणी आहेत, वकील मुके आहेत? संविधानात असा कुठलाही कायदा नाही, ज्य़ामुळे मी तुरुंगात जाईन.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news