नगर : पाथर्डीत अकरा वर्षीय दीक्षार्थीची मिरवणूक | पुढारी

नगर : पाथर्डीत अकरा वर्षीय दीक्षार्थीची मिरवणूक

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : जैन धर्माची दीक्षा घेणारा अकरा वर्षीय पर्व हर्षित शहा या दीक्षार्थी बालकाचा जैन बांधवांनी शहरातून वरघोडा मिरवणूक काढली. पिंडवाडा (राजस्थान) येथील शहा कुटुंबीय मूळचे असून सध्या ते भिवंडी येथे स्थायिक आहेत. अकरा वर्षीय पर्व याचे गुरु मुनीराज गंधरत्न महाराज यांच्या प्रेरणेने 26 जानेवारी रोजी भिवंडीला पर्व शहा यांची दीक्षासमारंभ होणार आहे. यानिमित्त सकल जैन बाधवांनी शहारातील नवीपेठ येथून सकाळी मिरवणूक काढाली. जैन विद्यालयाचे बँड पथक, हातात धरलेले मुलांचे ध्वज पथक, एक समान वेशभूषा समाज बाधवांनी केली होती. ही मिरवणूक लक्षवेधी ठरली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, नाईक चौक, अजंठा चौक, क्रांती चौक, नवीपेठ, गांधी चौकातून ही मिरवणूक जैन स्थानकात येऊन दीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले. जैन स्थानकातील कार्यक्रमासाठी जैन श्रावण संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे, सुनील गुगळे, फुलचंद गुगळे, राजेंद्र मुथा, घेवरचंद भंडारी, डॉ विनय कुचेरिया, विजय लुणवात, चंदन कुचेरिया, चांदमल देसर्डा, अनिल गुगळे, सुभाष खाबिया, कचरदास सुराणा, धीरज गुंदेचा आदी उपस्थित होते.
दीक्षार्थी पर्वचे वडिल हर्षित शहा, आई आशिका शहा आणि बहीण रियाना शहा यांचाही सत्कार झाला. प्रास्ताविक सुरेश गुगळे यांनी करुन आभार मानले.

संयमाच्या मार्गावर चालणार पर्व

अकरा वर्षीय पर्व कुटुंबाला सोडून जैन धर्माचे शिक्षण घेऊन धर्माचा प्रचार प्रसार जीवनभर करणार आहे. सर्व गोष्टीचा त्याग करून संयमाच्या मार्गावर पर्व चालणार आहे.

Back to top button