Ponniyin Selvan 2 : मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन-2 ची रिलीज डेट जाहीर | पुढारी

Ponniyin Selvan 2 : मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन-2 ची रिलीज डेट जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नमचा ब्लॉकबस्टर चित्रपट पोन्नियन सेल्वनच्या (Ponniyin Selvan 2) दुसऱ्या भागाच्या रिलीज डेट जाहीर करण्यात आलीय. चित्रपटाची प्रोडक्शन कंपनी लायकाने एक जबरदस्त टीजर जारी केला आहे. सुपरस्टार चियान विक्रम, कार्थी, ऐश्वर्या राय बच्चन आणि साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णन यासारख्या कलाकारांनी हा चित्रपट सजलेला आहे. निर्माते-दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट पोन्नियिन सेल्वन २०२३ मध्ये चित्रपटगृहात पाहायला मिळेल. (Ponniyin Selvan 2)

२०२२ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाला होता. दिग्दर्शक मणिरत्नमचा ब्लॉकबस्टर चित्रपटाचा दुसरा भाग २०२३ मध्ये एप्रिल महिन्यात येईल. निर्मात्यांनी या टीझर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे की, २८ एप्रिल, २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये पोहोचेल. या चित्रपटाचा प्रोमो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

पोन्नियिन सेल्वन -१ ने कमावले ४०० कोटी रुपये

दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट पोन्नियिन सेल्वन पार्ट-१ ने २०२२ मध्ये चित्रपटगृहात बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत वर्ल्डवाईड ४०० कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाला जबरदस्त प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पीएस १ चित्रपटाने साऊथचं नव्हे तर उत्तर भारतातही दमदार कमाई केली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार बिझनेस केला.

या चित्रपटाशी होणार टक्कर

तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, कार्थी, ऐश्वर्या राय बच्चन आणि तृषा कृष्णनचा चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन-२’ सन २०२३ मध्ये उन्हाळ्यात रिलीज होईल. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी करण जोहर स्टारर चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानीदेखील रिलीज होईल. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर पहायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lyca Productions (@lyca_productions)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lyca Productions (@lyca_productions)

Back to top button