Sidharth-Kiara : सिड-कियाराचे दुबईमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशन! (Photos) | पुढारी

Sidharth-Kiara : सिड-कियाराचे दुबईमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशन! (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचे सोशल मीडियावर न्यू ईअर सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत. दोघांचे लग्न ६ फेब्रुवारीला होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु, आतापर्यंत सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth-Kiara) आणि कियारा आडवाणीकडून याविषयी कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही. आता दोघांचे विमानतळावरून काही फोटो समोर आले होते. हे फोटो समोर आल्यानंतर आता नव्या वर्षात दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झालीय. आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीचे नवे फोटो समोर आले आहेत. यामध्ये दोघेही न्यू ईअर सेलिब्रेट करताना दिसत आहेत. (Sidharth-Kiara )

सोबत दिसले सिड-कियारा

सिद्धार्थ मल्होत्रा – कियारा आडवाणी न्यू ईअर पार्टीत सोबत दिसले. सिद्धार्थ मल्होत्रा – कियारा आडवाणीचे हे सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत.

राणी मुखर्जीदेखील दिसली पार्टीत

न्यू ईअर पार्टीत सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी, राणी मुखर्जी, मनीष मल्होत्रादेखील दिसले.

खास अंदाजात करण जोहर

करण जोहर या पार्टीत एकदम खास अंदाजात दिसत आहे. कियाराने या फोटोत शॉर्ट ड्रेस घालून एकापेक्षा एक पोझ देताना दिसते. कियाराचे हे फोटो फॅन्सच्या खूप पसंतीस उतरले आहेत.

मनीष मल्होत्राने शेअर केले फोटो

पार्टीचे हे फोटो मनीष मल्होत्राने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. हे फोटो कूप व्हायरल होत आहेत.

जाहिरातीत एकत्र काम करत आहेत सिड-कियारा

सिड-कियारा यांचा एक फोटो समोर आलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिड-कियारा एका जाहिरातीत एकत्र काम करत आहेत. या ॲडशूट दरम्यानचा फोटो समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05)

Back to top button