Ranbir Kapoor Animal : हातात सिगारेट, रक्ताने माखलेली कुऱ्हाड…रणबीरचा ‘एनिमल’ लूक लक्षवेधी | पुढारी

Ranbir Kapoor Animal : हातात सिगारेट, रक्ताने माखलेली कुऱ्हाड...रणबीरचा 'एनिमल' लूक लक्षवेधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्मात्यांनी २०२३ ची धमाकेदार सुरुवात केलीय. रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor Animal) चित्रपट ‘एनिमल’ फर्स्ट लुकचा पोस्टर आणि व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड आहे. तो सिगारेट पेटवताना दिसतोय. रणबीरच्या एनिमल या चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरने धुमाकूळ घातला आहे. (Ranbir Kapoor Animal ) या चित्रपटाचे पोस्टर न्यू ईअरच्या निमित्ताने रात्री १२ वाजता रिलीज करण्यात आले. तो या लूकमध्ये हिंसक अवतारात दिसतोय. त्यामुळे त्याची भूमिका काय असेल, याचा अंदाज येतो.

‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र : भाग १’ सारख्या चित्रपटामध्ये तो दिसला होता. ‘एनिमल’ हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी याआधी ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंह’ यासारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बनवले आहेत.

रश्मिकासोबत रणबीरची केमिस्ट्री

या चित्रपटात अनिल कपूर यांचीही भूमिका आहे. ‘एनिमल’ मध्ये ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदानादेखील दिसणार आहे. हा या दोघांचा पहिला चित्रपट आहे. अनिल कपूर यांनी ‘एनिमल’चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करताना लिहिलं की, ‘तुमच्या समोर ANIMAL चं फर्स्ट लूक पोस्टर घेऊन हजर. हॅप्पी न्यू ईअर मित्रांनो. रणबीर कपूर लवकरच आपल्या आतील ‘एनिमल’ रिलीज करेल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir Kapoor (@ranbir__kapoor82)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir Kapoor (@ranbir__kapoor82)

Back to top button