पुढारी ऑनलाइन डेस्क : Long Drive Story : थायलंडमधील दाम्पत्य कारने लाँग ड्राईव्हसाठी निघाले. काही अंतर पार केल्यानंतर टॉयलेटसाठी त्यांनी कार थांबवली. मात्र आपल्याच विचारात मग्न असणार्या नवर्याने चक्क बायकोला विसरुनच पुढील प्रवास सुरु केला. त्यामुळे संबंधित महिलेला तब्बल 20 किलोमीटर चालावे लागले. पतीचा विसरळभोळेपणा सांगणारे वृत्त 'एनडीटीव्ही'ने न्यू यॉर्क पोस्टच्या हवाल्याने दिले आहे.
Long Drive Story : दिलेल्या माहितीनुसार, बुंटम चैमून, (५५) व आमनुए चैमून, (४९) दाम्पत्याने रविवारी शहरातच महा सराखाम प्रांतातच रोड ट्रीपचा बेत आखला. दोघांनी एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला. मध्यरात्री तीनच्या सुमारास कार पार्क करुन बुंटम टॉयलेटला गेले. याचवेळी आमनुए या आसपास कुठे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे का हे पाहण्यासाठी कारमधून बाहेर पडली. मात्र, आसपास कोठेही स्वछतागृह नसल्याने ती जवळपासच्या जंगलात गेली. बुंटम परतला तेव्हा त्याने आमनुए गाडीत नाही हे लक्षातच घेतले नाही आणि तसाच निघून गेला.
Long Drive Story : जेव्हा आमनुए परतली तेव्हा बुंटम किंवा त्याची कार आजुबाजूला कुठेही नव्हते. तिला लवकरच जाणीव झाली की तिचा नवरा बुंटम तिला अशा ठिकाणी सोडून एकटाच निघून गेला आहे. तसेच तिच्याजवळ तिचा फोनही नव्हता. कारण गाडीतून उतरताना तिने फोन तिच्या जवळच ठेवला. त्यांनी जिथे गाडी थांबवली तो रस्ता एकदम सामसूम होता. त्यात रात्र असल्यामुळे दाट काळोख होता. अशा परिस्थितीत ती खूप घाबरली होती. मात्र, तरी तीने थोडे अंतर चालत जाऊन कुठे मदत मिळते का ते शोधण्याचा प्रयत्न केला.
Long Drive Story : कुठे मदत मिळते का ते पाहण्यासाठी ती थोडेथोडके नव्हे तब्बल 20 किमी (12.4 मैल) चालत काबीन बुरी या जिल्ह्यात पहाटे 5 वाजता पोहोचली. तिच्या थे तिला एका लोकल पोलिसाच्या मदतीने नव-याला कॉल करण्याची संधी मिळाली. मात्र, नव-याचा नंबर तिच्या लक्षात नव्हता. त्यामुळे तीने स्वतःचा नंबर डायल केला. तिने स्वतःच्या नंबर वर तब्बल 20 वेळा डायल केला. पण कोणीही फोन उचलला नाही. शेवटी 8 वाजताच्या दरम्यान एका पोलिसाच्या मदतीने तिला तिच्या नव-याशी संपर्क करता आला. हे सर्व नव-याच्या एका छोट्याशा गैरसमजामुळे घडले. रात्री ब्रेक घेतल्यानंतर बुंटम जेव्हा परत आला तेव्हा त्याला असे वाटले की आमनुए खूप थकल्यामुळे कारच्या बॅकसीटवर झोपली आहे
Long Drive Story : बुंटमला जेव्हा आमनुए अडचणीत आली आहे हे कळाले. तो ताबडतोब तिला घेण्यासाठी कोराट प्रोवीनहून तब्बल 159.6 किमी (100 मैल) गाडी चालवत आला. त्याने आमनुएची आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. आमनुएने मात्र एवढे होऊनसुद्धा कोणताही वाद घातला नाही. पोलिसांनी जेव्हा त्यांना त्यांच्याबद्दल माहिती विचारली तेव्हा आमनुएने सांगितले की, त्यांच्या लग्नाला 27 वर्षे झाली असून त्यांना 26 वर्षाचा एक मुलगा आहे.
हेही वाचा :