कोल्हापूर : डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांची चर्चा | पुढारी

कोल्हापूर : डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांची चर्चा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. दै. ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव याप्रसंगी उपस्थित होते.

कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्तीनंतर फुलारी यांनी दै. ‘पुढारी’ कार्यालयाला भेट दिली. फुलारी यांनी डॉ. जाधव यांच्याशी कोल्हापूर पोलिस आयुक्तालय, परिक्षेत्रातील परिस्थिती, सीमाभागातील सद्यःस्थिती, पोलिसांची भूमिका आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली. विविध सामाजिक प्रश्नांवर दै. ‘पुढारी’चे मोठे योगदान आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेलाही मदत होत असल्याचे फुलारी यांनी सांगितले. यावेळी डॉ. जाधव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

दै.‘पुढारी’ने आतापर्यंत मांडलेले विविध सामाजिक प्रश्न, सियाचीन येथील सैनिकांसाठीचे हॉस्पिटल, भूज येथील हॉस्पिटल, ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ‘सिंहायन’ या आत्मचरित्राचे अनेक किस्से ‘बहार’ पुरवणीतून वाचल्याचे तसेच त्यातून महाराष्ट्राची जडणघडण डोळ्यांसमोर उभी राहिल्याचे फुलारी यांनी सांगितले. डॉ. प्रतापसिंह जाधव व डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते फुलारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Back to top button