Hardeek-Akshaya : राणादा-पाठकबाईंचे रोमँटिक क्षण कॅमेराबद्ध

अक्षया-हार्दिक
अक्षया-हार्दिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुझ्यात जीव रंगला फेम अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे लग्नातील रोमँटिक क्षण कॅमेऱ्याबद्ध झाले आहेत. त्यांच्या लग्नातील अक्षता वेळचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोघांचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. (Hardeek-Akshaya) हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. सुंदर मुंडावळ्या, पिवळ्या रंगाची साडी, गळ्यात लक्षवेधी मंगळसूत्र, कानात झुमके, हातात हिरव्या बांगड्या आणि शोभतील असे दागिने असा शृंगार करुन अक्षया उभी असलेली या व्हिडिओत दिसते. (Hardeek-Akshaya)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अक्षया आणि हार्दिकचा हा लग्नातील व्हिडिओ असून तो अक्षयाने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओला तिने तीन यलो हार्ट ??? इमोजी शेअर केले आहेत. हार्दिक पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसतोय. फेटा आणि गालावर हसू तर अक्षयादेखील आनंदात दिसतेय. आनंदाच्या भरात ती हार्दिकचा किस घेताना दिसतेय.

हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी त्यांना खूप साऱ्या लव्ह इमोजी शेअर केले आहेत. अनेकांनी त्यांना वैवाहिक सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी काय म्हटलंय पाहा- My always time fav couple… Happy married life ❤️, खूप सुंदर ????????, सुंदर जोडप❤️?, Cutest couple ever ❤️❤️?, Happy marriage life madam ???, Rananjali❤️❤️, Yellow ???, Hello Anjali tai???.

लग्नात केला खास लूक

लग्नातील खास लूक विषयी अक्षयाने पोस्ट केली होती. तिने लिहिलं होतं की- 'मला माझ्या लग्नात अगदी पारंपरिक लूक करायचा होता. नऊवारी, खोपा, पारंपरिक दागिने आणि सगळं टिपिकल. कारण मला आवडतं…' या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छा आणि लाईक्सचा वर्षाव झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news