सांगली : स्मार्ट बुकमधील योजनांची माहिती द्या

सांगली : स्मार्ट बुकमधील योजनांची माहिती द्या
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट पीएचसी बाबत वैद्यकीय अधिकारी यांनी सतर्क रहावे, दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी. तसेच आशा स्वयंसेविका यांनी स्मार्ट बुकमधील योजनांची माहिती चांगल्या प्रकारे ग्रामस्थांना द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात आरोग्य संजीवनी योजनेअंतर्गत स्मार्ट पीएचसी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहे. या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पायाभूत भौतिक सोयी – सुविधा उपलब्ध करून दर्जेदार आरोग्य सेवा देणेत येत आहेत. लोकांचा सक्रिय सहभाग घेण्यासाठी आरोग्य सेवांविषयी जनजागृती आणि रुग्ण अभिप्रायानुसार सेवा पुरविल्या जात आहेत. ग्रामस्थांना दवाखाना आपला वाटावा, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामीण आरोग्य स्वच्छता व पोषणदिन कार्यक्रमामध्ये नागरिकांना सहभागी करून घेतले जात आहे. रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षांकडून फिडबॅक घेऊन योजनेतील निवडक दर्शकांचे तिमाही मूल्यमापन करण्यात येत आहे. तसेच चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. आतंर रुग्ण व बाह्य रुग्ण विभागाच्या व्यवस्थापणासाठी ई-ओपीडी/टोकन प्रणाली स्वतंत्र सॉप्टवेअर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू करणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, स्मार्ट पीएचसी अंतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची व देण्यात येणार्‍या सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी जिल्ह्यात आरोग्य संजीवनी उपक्रमातंर्गत स्मार्ट पीएचसी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news