पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अली बाबा' फेम अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात नवे अपडेट्स येत आहेत. पोलिसांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, कोर्टाने अभिनेता शीजान खानला ४ दिवसांच्या पोलिस कस्टडी सुनावली आहे. अभिनेत्री तुनिषा शर्माचा (Tunisha Sharma Case) पोस्टमॉर्टम रिपोर्टदेखील समोर आलाय, त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, तिचा मृत्यू श्वास घुटमळून झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तुनिषा ब्रेकअपच्या कारणामुळे पूर्णपणे खचली होती. तुनिषाने आईलादेखील याविषयी सांगितलं होतं की, शीजानने माझ्याशी ब्रेकअप केला आहे, तो माझ्याशी बोलत नाही. आता या प्रकरणामध्ये आणखी नवे अपडेट्स येत आहेत. (Tunisha Sharma Case)
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ची मागणी आहे की, महाराष्ट्र सरकारने अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे.
शनिवारी अलीबाबा – दास्तान-ए-काबुलच्या सेटवर तिने जीवन संपवले. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शीजान खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तुनिषा शर्मा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १४ लोकांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये 'अली बाबा' शी संबंधित काही लोक आहेत.
२४ डिसेंबर रोजी टीव्ही इंडस्ट्री आणि तिच्या फॅन्ससाठी ही खूप दुर्देवी घटना समोर आली होती. तुनिषाने दुपारी जवळपास ३:३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. 'फितूर' आणि 'बार बार देखो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी तुनिषा फक्त २० वर्षांची होती. टीव्ही जगतात 'मरियम' नावाने प्रसिद्ध असलेली तुनिषा 'अली बाबा' मालिकेत काम करत होती.
तुनिषा शर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मंगळवारी २७ डिसेंबर रोजी होईल. रिपोर्टनुसार, आई वनीता शर्मा ही मावशी आणि मोठ्या बहिणीची प्रतीक्षा करत आहे. ख्रिसमसमुळे त्यांना फ्लाईटचे तिकिट मिळालेले नाही.
हेदेखील वाचा-