Aircraft color : विमानाचा रंग पांढराच का? | पुढारी

Aircraft color : विमानाचा रंग पांढराच का?

नवी दिल्ली : विमानाचा रंग (Aircraft color) प्रामुख्याने पांढराच असतो हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. मात्र, पांढरा रंगच का, असा प्रश्न कोणालाही पडेल. यामागची कारणे आर्थिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही स्वरूपाची आहेत. यातील मुख्य कारण म्हणजे पांढरा रंग विमानाला जास्त गरम होऊ देत नाही. विमान धावपट्टीपासून आकाशापर्यंत सूर्यप्रकाशात राहते. या कारणास्तव, सूर्याची किरणे विमानावर बराच वेळ पडतात आणि यामुळे विमानातील तापमानदेखील जास्त असू शकते.

पांढरा रंग सूर्याच्या अवरक्त किरणांना परावर्तित करतो आणि त्यांना विमानात (Aircraft color) प्रवेश करण्यापासून रोखतो. त्यामुळे विमानांना पांढरा रंग दिला जातो. पांढर्‍या विमानात कोणत्याही क्रॅक असल्यास तो सहजपणे शोधता येतो. यामुळे विमानाला इतर रंगांऐवजी पांढर्‍या रंगाने रंगवले जाते. इतर रंगांपेक्षा पांढर्‍या रंगात अधिक द़ृश्यमानता असते.

पांढर्‍या रंगाचे विमान (Aircraft color) आकाशात सहज दिसू शकते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होते. ह्युमन-वाइल्डलाइफ इंटरेक्शनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात सांगण्यात आले आहे की, पक्षी आकाशातील पांढरे विमान दूरवरून पाहू शकतात. या कारणास्तव, इतर रंगांच्या तुलनेत विमानांवर पांढरा रंग जास्त वापरला जातो. अन्य रंगांच्या तुलनेत पांढर्‍याचे वजन कमी असते. त्यामुळे विमानाचे वजन कमी व्हायला मदत होते. अन्य कोणताही रंग वापरल्यास विमानाचे वजन वाढू शकते. हे कारणही खूप महत्त्वाचे मानले जाते.

हेही वाचा :  

Back to top button