ahem पुढारी वृत्तसेवा : काही महिन्यांपूर्वीच जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आयसीयू विभागाला रुग्णालय प्रशासन रुग्णांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. दुरूस्त झालेला आयसीयू विभाग तत्काळ रुग्णांसाठी खुला करावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे यांनी दिला. निवेदनात म्हटले, सर्वसामान्य घरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयातील आयसीयूचे दर रुग्णांना परवडणारे नसतात. त्यावेळेस रुग्ण हे गंभीर आजाराशी झुंज देत असताना, ते मोठ्या आशेने सरकारी रुग्णालयाचा आधार घेण्यासाठी रुग्णालयात येतात.
मात्र, आयसीयू विभाग फुल आहे, जागा नाही. याचबरोबर डॉक्टर-नर्स उपलब्ध नाहीत, खासगी दवाखान्यात घेऊन जा, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कित्येक तास चर्चेअभावी रुग्णाला अत्यंत गंभीर अवस्थेत ताटकळत ठेवले जाते. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कित्येक रुग्णांना आरोग्यसेवेअभावी जीव गमवावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयाचा जळीत झालेला अतिदक्षता विभाग (आयसीयू) नव्याने तयार होऊन कित्येक महिन्यांपासून केवळ उद्घाटनाअभावी बंद ठेवण्यात आला आहे. अतिदक्षता विभाग लवकरात लवकर खुला न केल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी सोन्याबापू घेंबुड, माऊली जाधव, ऋषी गवळी, तुका कोतकर, अॅड. शुभम बंब, शिवम् ठुबे, तुषार हांगे, अनिकेत लोंढे, अमोल ठाणगे, ऋषी बागल, ओंकार आव्हाड, ऋषी आव्हाड, तनय बोरुडे, यश रासकर आदी उपस्थित होते.