Actress Tunisha Sharma Death Case: अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी अभिनेता शीझान खानला अटक | पुढारी

Actress Tunisha Sharma Death Case: अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी अभिनेता शीझान खानला अटक

पुढारी ऑनलाईन: ‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवरील मेकरुपमध्ये अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने स्वत:ला संपवले. यानंतर या प्रकरणात वालिव पोलिसांनी अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी तिचा मित्र सहकलाकार शीझान खानला अटक केली आहे. त्याच्यावर तुनिषाला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भादंवि कलम ३०६ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तुनिषा शर्माच्या आईने फिर्याद दिल्यानंतर शीझान खान या कलाकाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शीझान खानला  उद्या न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार असून आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत, अशी माहिती एसीपी चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

दरम्यान, तुनिषा शर्माच्या अशा या अचानाक जाण्याने  तिच्या सहकाऱ्यांना आणि मनोरंजन क्षेत्राला मोठा मानसिक धक्का बसला आहे. (Actress Tunisha Sharma Death Case)

हेही वाचा:

Back to top button