

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकेकाळी अपवादात्मक चित्रपटांमध्ये वापरण्यात येणारी बिकिनी आज सर्रास वापरली जाते. केवळ अभिनेत्रीच नाही तर उच्च-मध्यमवर्गीय महिलांमध्ये बिकिनी घालण्याची फॅशन रूजली आहे. (Bikini Story) अभिनेत्रींपासून मॉडल्सपर्यंत बिकिनीमध्ये हॉट फोटोशूट करणे ट्रेडिंग बनले आहे. तुम्हाला माहिती आहे का, बिकिनीची सुरुवात कधी आणि कशी झाली? बिकिनीचं डिझाईन कोणी केलं आणि त्याला बिकिनी नाव कसं देण्यात आलं. आज सेलिब्रिटींनाही बिकिनीचं इतकं वेड का आहे? जाणून घेऊया. (Bikini Story)
कुठलाही ड्रेस डिझाईन केल्यानंतर त्याला 'फॅशन डिझाईन' असे म्हटले जाते. मात्र, बिकिनीचे डिझाईन ज्यांनी तयार केलं ते फॅशन डिझायनयर नव्हते. तर ते एक इंजिनिअर होते. त्यांचं नाव 'लुईस लेअर्द' असं आहे. मूळचे फ्रान्सचे असणारे 'लुईस रियर्ड' यांनी ५ जुलै १९४६ ला पहिली बिकिनी तयार केली. तेव्हापासून 'बिकिनी डे' सेलिब्रेट केला जातो.
बिकिनी हे नाव कसं पडलं? यामागे एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. पहिल्यांदा ज्या ठिकाणी बिकिनी तयार करण्यात आली. त्या ठिकाणाचे नाव 'बिकिनी अटोल' होतं, जे प्रशांत महासागरात आहे. त्याजागी अमेरिकेचे अणू आणि शस्त्र चाचणी परीक्षण करण्याचे ठिकाण होते.
बिकिनी आल्यानंतर बराच काळ याची जाहिरात आली नव्हती. कुठलीही मॉडल बिकिनीमध्ये जाहिरात करायला तयार होत नसे. मग, काही काळानंतर १९ वर्षांची पॅरिसची एक डान्सर, मॉडेल 'मिशेलिन बर्नरदिनी' ही बिकिनीमध्ये जाहिरात करायला तयार झाली. जशी ही बिकिनी जाहिरात समोर आली, चाहत्यांकडून मिशेलाइनला ५० हजार पत्रे मिळाली होती, असा किस्सा सांगितला जातो.
एक काळ असा होता की, ज्यावेळी स्पेन आणि इटलीत बॅन लावण्यात आलं होतं. परंतु, काही काळानंतर बॅन हटवण्यात आलं. १९५० पर्यंत मार्केटमध्ये बिकिनी आल्या. त्यानंतर अमेरिकेतही बिकिनीकडे कल वाढू लागला. १९६० मध्ये अमेरिकेने बिकिनीवरून बॅन हटवल्यानंतर लोकांचा बिकिनीकडील कल अधिक वाढलेला दिसून आला. लुईसच्या या अविष्काराचा ट्रेंड दुसर्या महायुद्धानंतर युरोपमध्ये वाढू लागला.
बिकिनीच्या आधी फॅशन डिझायनर हेम याने ॲटम नामक एक स्मॉल बाथिंग सूट तयार कलं होतं. परंतु, लुईसने ज्यावेळी बिकिनी लॉन्च केलं आणि हेमच्या ॲटम बाथिंग सूटपेक्षाही लहान ड्रेस असल्याचं सांगितलं, त्यावेळी हेमचा बाथिंग सूट मागे पडला.
काळाच्या ओघात बिकिनीची जादू लोकांवर झालेली पाहायला मिळाली. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत बिकिनीचा वापर वाढला. आज चित्रपटांमध्ये बिकिनीचा वापर सर्रास झाला आहे. मॉडलिंगच्या दुनियेत बिकिनी शूट आणि फॅशन शो अधिक प्रसिद्ध होऊ लागला आहे. चित्रपटात अभिनय करताना कथेची मागणी असल्यास किंवा गरज असल्यास अभिनेत्रींना बिकिनी परिधान करावी लागते. कधी कधी बॉलिवूड बिझनेसचा एक हिस्साही असू शकतो. मनोरंजन सोबत ग्लॅमर दाखवणंही खूप गरजेचं असतं. अभिनेत्री स्वत:ला मॉडर्न आणि स्वतंत्र दाखवण्यासाठी बिकिनी परिधान करतात, असं म्हटलं जातं. इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला स्थापित करून 'हम भी किसी से कम नही' हे अभिनेत्रींनी दाखवून दिलं आहे.
समुद्र किनारी जातानाही तरुणी बिकिनी घालण्यास प्राधान्य देतात. आज मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स आणि मिस इंडिया यासारख्या स्पर्धांमध्ये बिकिनी कॉम्पिटिशन ठेवलं जातं. बिकीनी, मोनोकिनी असे कपडे परिधान करण्यास सेलिब्रिटी प्राधान्य देतात.