पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता शाहरुख खान याने त्याचा आगामी चित्रपट 'पठाण', त्याचे कुटुंब, फिफा विश्वचषकातील त्याचा आवडता संघ आणि इतर अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांशी संवाद साधला. त्यानंतर शाहरुख खानने चाहत्यांचे प्रेम आणि वेळ दिल्याबद्दल आभार मानले. शाहरुखने ट्विट केले आहे की, "आता माझी टीम मला कामावर बोलावत आहे. तुमच्या सर्वांशी दुसऱ्या दिवशी बोलेल. ज्यांचाशी संवाद राहिला आहे त्यांनी कृपया वाईट वाटू नका…"अभी पिक्चर बाकी है…". तुमचं प्रेम आणि तुमचा वेळ याबदद्ल धन्यवाद. भेटूया लवकरच थिएटरमध्ये" (Pathaan Controversy )