Bangladesh vs India 1st Test : ‘या’ बांगलादेशी फलंदाजाने भारताविरुद्ध रचला इतिहास; पदार्पणातच झळकावले शतक | पुढारी

Bangladesh vs India 1st Test : ‘या’ बांगलादेशी फलंदाजाने भारताविरुद्ध रचला इतिहास; पदार्पणातच झळकावले शतक

चट्टोग्राम; पुढारी ऑनलाईन : बांगलादेशचा फलंदाज झाकीर हसनने (Zakir Hasan) भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. झाकीर हसनने याच सामन्यातून कसोटी पदार्पण केले आहे. (Bangladesh vs India 1st Test)

पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा झाकीर हा बांगलादेशचा चौथा फलंदाज आहे. यापूर्वी अनिमुल इस्लाम (Animul Islam) आणि मोहम्मद अश्रफुल (Mohammad Ashraful) यांनी बांगलादेशसाठी असा पराक्रम केला होता. अनिमुल इस्लामने 2000 साली भारताविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते. त्याचवेळी मोहम्मद अश्रफुलने 2001 मध्ये पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले होते. याशिवाय अबुल हसनने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी बजावली होती. (Bangladesh vs India 1st Test)

झाकीर हसनने 100 धावांची इनिंग खेळून बाद झाला. अश्विनने झाकीरला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. झाकीर हसनने आपल्या डावात 224 चेंडूंचा सामना केला. 100 धावांच्या शानदार खेळीदरम्यान या बांगलादेशी सलामीवीराने 12 चौकार आणि 1 षटकार मारण्यात यशस्वी ठरला.

पदार्पणाच्या कसोटीत शतक करणारा पहिला बांगलादेशी सलामीवीर 

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात झाकीर हसन सलामीवीर म्हणून पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा बांगलादेशचा पहिला सलामीवीर ठरला आहे. याआधी बांगलादेशच्या सलामीवीर फलंदाजाने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले नव्हते. म्हणजे झाकीरने हे करून बांगलादेश क्रिकेटमध्ये नवा इतिहास नक्कीच लिहिला आहे.

अधिक वाचा :

Back to top button