Rakul Preet Singh: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रकुल प्रीतला ED कडून समन्स | पुढारी

Rakul Preet Singh: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रकुल प्रीतला ED कडून समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीतला ईडीने ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स पाठवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन वेगवेगळ्या प्रकरणात अभिनेत्री रकुलला समन्स पाठवण्यात आले आहे. (Rakul Preet Singh) रकुल प्रीतला ईडीने ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणी तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील काही लोकांची चौकशी करण्यात आलीय. त्यानंतर रुकुलला समन्स पाठवण्यात आलं आहे. (Rakul Preet Singh)

हे ड्रग्ज प्रकरण जुलै २०१७ मध्ये चर्चेत आले होते, जेव्हा कस्टम अधिकाऱ्यांनी संगीतकार कॅलविनकडून ३० लाख रुपयांचे ड्रग्ज ताब्यात घेतले होते. या प्रकरणी बोलताना ईडीने म्हटलं होतं की, तेलंगाना एक्साईजने या प्रकरणी १२ लोकांवर केस दाखल केली होती. ११ चार्जशीट फाईल दाखल केली. यापैकी ८ लोकांविरोधात ड्रग्ज प्रकरणी चार्जशीट फाईल केली आहे. आम्ही एक्साईज ऑफिशिअल्सना साक्षीदार होण्यासाठी सांगितलं आहे. याप्रकारे आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत टॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांना साक्षीदार मानले जाईल.

रकुल प्रीत सिंहशिवाय ‘या’ स्टार्सचे नाव यादीत

एक्साईजनंतर ईडीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संशय झाला होता. या प्रकरणी तपास सुरु केल्यानंतर रकुल प्रीत सिंहसोबत चार्ममे कौर, तेजा मुमैथ खान, राणा दग्गुबाती आणि पुरी जगन्नाथ यांना चौकशीसाठी समन्स जारी करण्यात आलं आहे.

ईडीकडून रकुल प्रीत सिंहची १९ डिसेंबर रोजी चौकशी होईल. याप्रकरणी ईडीने अनेक टॉलीवूड चित्रपट सेलेब्सची चौकशी केलीय.

डॉक्टर जीमध्ये केलं होतं काम

रकुल प्रीत सिंहने आयुष्मान खुरानासोबत चित्रपट ‘डॉक्टर जी’मध्ये काम केलं होतं. ‘डॉक्टर जी’ला ओटीटीवर खूप पसंती मिळाली होती.

Back to top button