Welcome 3 : वेलकम ३ फ्रेंचायजीमध्ये अक्षय कुमारची पुन्हा वापसी?

akshay kumar
akshay kumar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार, अनिल कपूर, नाना पाटेकर, फिरोज खान, परेश रावल और कटरीना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. (Welcome 3 ) तर दुसऱ्या भागात अक्षयच्या जागी जॉन अब्राहम, कॅटरीना जागी श्रुती हासन आणि फिरोज यांच्या जागी नसीरुद्दीन शाह होते. अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर सुपरहिट कॉमेडी फिल्म 'वेलकम' (Welcome) च्या तिसऱ्या भागाचे टायटल समोर आले आहे. चित्रपट निर्माते फिरोज ए. नाडियाडवाला (Firoz A. Nadiadwala) यांनी एका चर्चेत या चित्रपटाचा खुलासा केला आहे. पण, सर्वात मोठा हा प्रश्न आहे की, तिसऱया भागात अक्षय कुमार वापसी करेल का? कारण फिरोज यांचा आणखी एक चित्रपट 'हेरा फेरी ३' (Hera Pheri 3) मधून अक्षय कुमार बाहेर झाला आहे. निर्माता आणि कलाकार यांच्यामध्ये वाद देखील आहे. (Welcome 3 )

कारण, अक्षय कुमारने हा दावा केला होता की, त्याला 'हेरा फेरी ३' ची स्क्रिप्ट आवडली नव्हती.

फिरोज नाडियाडवालाने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले होते की, "वेलकम ३ ला अधिकतर 'वेलकम टू दि जंगल' नावाने ओळखलं जाईल. याशिवाय मिलिट्री ॲक्शनवर आधारित असेल. चित्रपटात ॲक्शन असेल. ह्यू हेलीकॉप्टरचा वापर करण्यात येईल.

६०-७०% शूटिंग जंगलमध्ये होणार

फिरोज नाडियाडवाला म्हणाले की, ६०-७० टक्के भाग जंगलात शूट होईल. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे शूटिंग जम्मू-काश्मीर वा युरोपच्या काही भागत होईल. येथे घनटाट जंगल असेल.

स्टार कास्ट

'वेलकम टू दि जंगल' ची स्टारकास्ट फायनल केलेली नाही. यामध्ये अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. ते म्हणतात की, "यामध्ये मोठे स्टार असतील. सर्व मुख्य भूमिकेत ॲक्शन करताना दिसतील."

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news