Video : या तरूणाने चक्क कंटेनरमध्ये फुलवलं केशराचं नंदनवन

Video : या तरूणाने चक्क कंटेनरमध्ये फुलवलं केशराचं नंदनवन

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण नेहमीच म्हणत असतो पुणे तिथे काय उणे. पुणेकर नेहमीच आपल्या भन्नाट कल्पना जगासमोर मांडत असतात. आणि अशीच एक भन्नाट शेती केलीये पुण्यातील शैलेश मोडक या तरुणाने. शैलेश मोडक असं या प्रयोगशील शेतकरी तरूणाचं नाव आहे. शैलेश यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केलंय. त्यांनी विदेशातही नोकरी केली. परंतु यात त्यांच समाधान झालं नाही. परिणामी त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन खादी ग्रामोद्यागाचा मधमाशीपालनाचा कोर्स केला. पण आणखी काही वेगळं करू देण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देईना. यातूनच त्याला संकल्पना सुचली ती केशर शेतीची.

महागड्या पिकामंध्ये केशरचं नाव येतं. एक ग्रॅम केशरची किंमत 300 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत असते. भारतामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश सारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशात या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. पुण्यातील एका तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चक्क केशरची शेती केलीये.

आणि महाराष्ट्रसारख्या उष्ण हवामान असलेल्या भागात देखील केशरची तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करता येणे शक्य असल्याचे शैलेश मोडक यांनी दाखवून दिले आहे. कंटेनर फार्मिंगच्या मदतीने शैलेश यांनी पुण्यात केशरचे पीक उत्पादित करून दाखवले आहे.  एका बंद कंटेनर मध्ये केशरची शेती करण्यासाठी शैलेश यांनी त्यापद्धतीने प्रशिक्षण घेतलं आणि मग प्रयोगाला सुरूवात केली. विशेष म्हणजे  शैलेश यांनी मातीशिवाय शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news