पिंपरी : पालिकेच्या 12 अधिकार्‍यांकडून खुलासा सादर | पुढारी

पिंपरी : पालिकेच्या 12 अधिकार्‍यांकडून खुलासा सादर

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या जनजागृती कार्यशाळेला आणि बैठकांना दांडी मारणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 1 सहशहर अभियंता, 7 उपायुक्त, 3 सहायक आयुक्त व एका क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 12 अधिकार्‍यांना आयुक्त शेखर सिंह यांनी कारणा दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर अधिकार्‍यांनी खुलासा सादर केला आहे. त्यावर आयुक्त काय कारवाई करतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पर्यावरण स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, एलबीटी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले, सामन्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्यासह भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांना नोटीस बजावण्यात आली होती.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 जनजागृती कार्यशाळेचे 29 नोव्हेंबरला चिंचवडच्या ऑटो क्लस्टर हॉलमध्ये आयोजन केले होते. या कार्यशाळेला सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहणे सक्तीचे केले होते. मात्र, वरील अधिकारी या कार्यशाळेस उपस्थित नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी त्या 12 अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावर सर्व अधिकार्‍यांनी खुलासे सादर केले आहे. त्यावर आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button