पिंपरी : गुंतवणुकीच्या बहाण्याने 26 लाखांचा गंडा | पुढारी

पिंपरी : गुंतवणुकीच्या बहाण्याने 26 लाखांचा गंडा

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीवर जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून एकाची 26 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 3 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. इरण्णा हनुमंत भुसनुरे (34, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार, दीपक कृष्णा जगताप (48, रा. संभाजीनगर, चिंचवड), हरिशंकर मोहन मीना (रा. जयपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना फॉरन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जास्त मोबदला देतो, असे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादींकडून 26 लाख 35 हजार रुपये बँक खात्यावर घेऊन त्यांना घेतलेले पैसे अथवा मोबदला न देता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button