बिग बॉस मराठी ४ : डेंजर झोनमध्ये जाताच स्नेहलता वसईकर घराबाहेर | पुढारी

बिग बॉस मराठी ४ : डेंजर झोनमध्ये जाताच स्नेहलता वसईकर घराबाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीचं घर या आठवड्यात सदस्यांनी चांगलंच गाजवलं नाही घरात धुडगूस घातला. घरात रोज राडे होतात मग ते टास्कमध्ये असो वा घरातील कामावरून असो वा सदस्यांमध्ये असो… या आठवड्यात कोणीच कोणापेक्षा कमी नव्हतं असं कुठेतरी जाणवलं… राखीचं वागणं, अक्षय – प्रसादचं भांडणं, अपूर्वा विकासची खडाजंगी, प्रसाद – अमृतामध्ये झालेली बाचाबाची असो किरण माने आणि अमृता धोंगडे मध्ये झालेले कडाक्याचे भांडणं असो.

हा आठवडा सदस्यांनी गाजवला.BB Highschool नंतर भरलेल्या BIGG BOSS च्या चावडीत महेश मांजरेकर प्रत्येक सदस्यची शाळा घेणार असे वाटत असताना सरांनी गोड शब्दांत सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. आणि तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे प्रेक्षक आणि सदस्यांना वाटत असते. स्नेहलता आणि विकास डेंजर झोनमध्ये आले, स्नेहलताला घर सोडून जावे लागले. महेश सरांनी हे सांगताच अपूर्वा, अक्षय आणि स्नेहलताला अश्रू अनावर झाले.

बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे किरण मानेंना अमृता धोंगडेची चुगली आली. ते म्हणाले, मला असं वाटतं अमृताच्या बाबतीत विकासने जे ओळखलं होतं ते आता मला बरोबर वाटू लागलं आहे. मी विकासाची भांडून कायम अमृताची बाजू घ्यायचो. विकास मी तुझचं ऐकायला हवं. त्यावर अमृता म्हणाली, तुमच्यात जो तिसरा माणूस येईल तो मूर्ख आहे खरतर. त्यामुळे मी माफी मागते मी मध्ये आले.

पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? हे त्यांचा गेम ठरवेल. कोण होईल कॅप्टन? कोण होईल नॉमिनेट? कोण होईल सेफ? जाणून घेणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

Back to top button