आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण' नागपुरात देऊन गौरविणार | पुढारी

आशा भोसलेंना 'महाराष्ट्र भूषण' नागपुरात देऊन गौरविणार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारचा सर्वोच्च सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार लवकरच प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना नागपुरात दिला जाणार आहे. यासंदर्भात स्वतः आशाताईंनी संमती दिल्याची माहिती राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे महाराष्ट्र भूषण व इतर सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आलेले नाहीत. हे सर्व पुरस्कार एकाचवेळी प्रदान करण्याची सांस्कृतिक मंत्रालयाची योजना आहे. हिवाळी अधिवेशन काळात संपूर्ण सरकार, राज्यातील आमदार नागपूरमध्ये येतात. त्याचवेळी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा मुनगंटीवार यांचा मानस आहे.

Back to top button