भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी मालिका 'जिवाची होतिया काहिली' | पुढारी

भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी मालिका 'जिवाची होतिया काहिली'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘जिवाची होतीया काहिली’ ही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांच्या आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवती यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे.

मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे. अर्जुन आणि रेवथी यांची ही प्रेमकहाणी वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. सध्या अर्जुन आणि रेवती यांच्यात मैत्री झाली असून, या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. घरच्यांपासून लपूनछपून ही प्रेमकहाणी सुरू आहे. ती आता कोणते वळण घेईल, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

Back to top button