Deepika Padukone : दीपिका कतारला रवाना, FIFA मध्ये मिळाली मोठी संधी

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पदुकोणची ( Deepika Padukone ) फॅन फॉलोईंग इतकी जबरदस्त आहे, हे आपल्या सर्वांना चांगलेच माहित आहे. दीपिका पदुकोण करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. आता तिला आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. फिफा वर्ल्ड कपमध्ये जाण्याची तिला संधी मिळाली असून, तिला मोठी जबाबदारीही मिळालीय. (Deepika Padukone)

नोरानंतर दीपिका

खरे तर नोरा फतेहीनंतर आता दीपिका पदुकोणलाही फिफा वर्ल्ड कपमध्ये मोठी संधी मिळणार आहे. या अनुषंगाने दीपिका पदुकोण कतारला रवाना झाली आहे. दीपिका पदुकोण फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे.

फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीची झलक

फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करणे, ही दीपिकासाठी सन्मानाची बाब असेल. ही बातमी समजल्यानंतर स्पर्धेतील सर्व चाहत्यांमध्ये उत्साह आहे. नुकतीच नोरा फतेहीदेखील फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेली होती.

चाहत्यांची आतुरता

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे आता बरेच प्रोजेक्ट्स आहेत. दीपिका शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत 'पठाण'मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर, तिचे प्रभास आणि दिशा पटानीसोबत प्रोजेक्ट्स आहेत. याशिवाय दीपिका अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'द इंटर्न'च्या रिमेकमध्येही दिसणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news