Maharashtra-Karnataka :  संजय राऊतांचे खोचक ट्विट, "स्वाभिमानी म्हणून..." | पुढारी

Maharashtra-Karnataka :  संजय राऊतांचे खोचक ट्विट, "स्वाभिमानी म्हणून..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकल . स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे.” असं खोचक ट्विट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केले. (Maharashtra-Karnataka )

गेले काही दिवस  कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍नावरुन महाराष्ट्रात वातावरण चांगलचं तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी यांनी सीमाप्रश्नावर केलेल्‍या विधानांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न समन्वयक चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि उच्चाधिकार समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांचा मंगळवारी (दि.६) बेळगाव दौरा नियोजित होता. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला. मंगळवारी (दि.६) बेळगाव-हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी काही वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra-Karnataka : ऊठ मराठ्या ऊठ!

 खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,”दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!”

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली.क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता. तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकल . स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.हा षंढपणा आहे.” असं म्हणतं संजय राऊत यांनी पुन्हा एक ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्‍लाबोल केला.

हेही वाचा

Back to top button