Mirzapur 3 ची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! गुड्डू भैयाने शेअर केला VIDEO | पुढारी

Mirzapur 3 ची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! गुड्डू भैयाने शेअर केला VIDEO

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज ‘मिर्जापूर’च्या फॅन्ससाठी एक मोठे वृत्त समोर आले आहे.  या वेबसीरीजमधील गजगामिनी उर्फ ​​गोलू गुप्ताने आणि गुड्डू भैयाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Mirzapur 3)  (Mirzapur 3)

‘मिर्जापूर’च्या नव्या सीझनची प्रतीक्षा करणाऱ्यांना आता लवकरच सरप्राईज मिळू शकतं. कारण मिर्जापूर ३ चे शूटिंग पूर्ण झाले आहे. ही माहिती गोलू गुप्ता म्हणजेच अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि गुड्डू भैया म्हणजेच अली फजलने एक व्हिडिओ शेअर करुन दिली आहे.

अलीने टीमचे मानले आभार

अली फजलने सीजन ३ चे शूटिंग पूर्ण केले आहे. या औचित्याने एक इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने आपल्या शूटिंगच्या सेटवरील सर्व लोकांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याने एक मोठे इमोशनल नोट शेअर केले आहे.

श्वेताने म्हटलं की, सीजन ३ चे एपिसोड ऑफर झाल्यानंतर मी शूटिंग सुरू करण्याची प्रतीक्षा करू शकत नव्हते. जेव्हा आपण ‘मिर्जापूर’च्या शूटिंगसाठी सेटवर परत येता, तेव्हा ही एक जबाबदारी असते. विना शर्त आम्हाला प्रेक्षकांकडून प्रेम आणि आनंद मिळतो. आम्ही त्यांना कधी निराश करू शकत नाही . खरंतर मी देखील मिर्जापुरचा वेडा आहे.”

श्वेता एक वेगळ्या स्वभावाची आहे. ती प्रत्येक भूमिका खूप चांगल्या पद्धतीने साकारते. ‘मिर्जापूर’च्या सीजन ३ चे शूटिंग संपल्यानंतर श्वेताने इन्स्टाग्रामवर आपलं एक रील व्हिडिओ शेअर केला आहे.

पाहा वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

Back to top button