BBM4 – राखी VS विशाल निकम : अरेरावी नका करू इथे

rakhi sawant
rakhi sawant

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये विशाल आणि राखीमध्ये कडाक्याचे भांडणं झाले आहे, असे दिसून येते आहे. राखी बिग बॉस माझी कॉफी पाठवा आता… विशाल म्हणाला, तुमच्या बोलण्याने disturb होत आहे झोपा… राखी म्हणाली- तू झोप मला सांगू नकोस. विशाल म्हणाला- अरेरावी नका करू इथे. राखी म्हणाली माझी मर्जी. त्यावर विशालने देखील उत्तर दिले- मर्जी सगळीकडे नाही चालणार. विशाल म्हणाला-ओरड मोठ्याने 'नहीं सोने दुंगी'. बघूया हा वाद अजून किती वाढला. आजच्या भागामध्ये बघत राहा बिग बॉस मराठी-4.

आज घरात राखी VS विशाल बघायला मिळणार आहे. वादाची सुरुवात अमृता धोंगडे आणि राखी यांच्यापासून झाली. अमृता आणि विशाल बोलत असताना राखीने अमृताला विचारले, तुला झोपायचं नाहीये का ? तुला नृत्य करायचे आहे ? लाईट बंद झाले ना ? अमृता म्हणाली, झोपते आहे की. त्यावर राखी म्हणाली, मग झोप … आणि इथून वाद सुरु झाला.

अमृता म्हणाली, मला नाही झोपायचं इतक्यात. त्यावर राखी तिला म्हणाली, माझ्या डोक्यावर का नाचतेस ? अमृता म्हणाली, मी इथे बसून नाचते आहे. राखी म्हणाली, मी रात्री बसते तुझ्या डोक्यावर थांब… इडियट…माझी झोपच गेली. आता सगळे झोपल्यानंतर मी बोलणार… उगीच भांडणं ना? विशाल त्यावर म्हणाला, आता झोपा ना तुम्ही. राखी त्यावर म्हणाली, आता नाही झोपणार माझी झोप गेली…बोलणार मी आता, माझी मर्जी.

विशाल म्हणाला, तिला शिकवता आणि तुम्ही काय करताय? तिला का बोलताय एवढं तोंड वर करून. राखी म्हणाली, मी तेच करते आहे जे ती करत होती. विशाल म्हणाला, गप्प बसायचं. राखी म्हणाली, तू गप्प बस… पुढे काय झाले जाणून घेणं उत्सकतेचं ठरेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news