बिग बॉस मराठी 4 - समृद्धीने तेजस्विनीला पाठींबा देण्यास का नकार दिला ? | पुढारी

बिग बॉस मराठी 4 - समृद्धीने तेजस्विनीला पाठींबा देण्यास का नकार दिला ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात आज समृद्धी, अमृता धोंगडे, किरण माने आणि विकास एका विषयावर चर्चा करताना दिसणार आहेत, ज्यामध्ये समृद्धीने जाहीर केले ती या व्यक्तीला सपोर्ट करणार नाही.

टास्क दरम्यान सदस्य एकमेकांशी चर्चा करताना दिसतात. ज्यामध्ये ते टास्क दरम्यान कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, कोणाला कसं बाजूला करता येईल याविषयी बोलताना आणि रणनिती आखताना दिसतात. समृद्धीचे म्हणणे आहे, आता मला रोहित झाला तरी चालेल अपूर्वा झाली तरी चालेल, मी तेजाला सपोर्ट करणार नाही.

किरण माने म्हणाले, पहिल्यांदा अपूर्वाच्या पोत्यातले तिनेच काढले होते ना ? अमृता धोंगडेने विचारले, मग दुसऱ्यांदा काय झाले? समृद्धी म्हणाली, तिला influence केलं त्यांनी आणि अक्षय आल्यावर… अमृता म्हणाली, स्नेहा आणि अक्षय तिला वरून सांगत आहेत, तेजस्विनीला… मला असं झालं हे कधी झालं ?

आता यांचं नक्की काय म्हणणे आहे ? समृद्धीने तेजस्विनीला पाठींबा देण्यास का नकार दिला ? बघूया आजच्या भागामध्ये.

Back to top button