Bigg Boss Marathi 4 : हिडीस बाई दिसतेस गप्प बस; अमृतावर भडकली तेजस्विनी | पुढारी

Bigg Boss Marathi 4 : हिडीस बाई दिसतेस गप्प बस; अमृतावर भडकली तेजस्विनी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 4 ) घरात काल किरण माने यांची पुन्हा एन्ट्री होताच सगळी समीकरणं बदली. अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये कडाक्याचे भांडण झाले ज्यामध्ये अमृता म्हणून गेली, घरात सगळ्यात सेफ गेम खेळणारी व्यक्ती म्हणजे “तेजस्विनी लोणारी” आहे. तेजस्विनी म्हणाली, माझी चूक होते मी तुझ्याकडे नेहेमी येते आता. दोघींमधील मतभेद आणि भांडणं कधी मिटेल बघूया. काल घरात परतल्यावर किरण माने यांनी सदस्यांना दिलेल्या १ ते १० या क्रमवारीनुसार त्यांची जागा दाखवून दिली. बिग बॉस यांनी जाहीर केले किरण माने यांनी निवडलेल्या १ ते ५ क्रमावर असलेल्या सदस्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळत आहे. (Bigg Boss Marathi 4)

तेजस्विनी, रोहित, विकास, अपूर्वा आणि समृद्धी यांना कॅप्टन्सीची उमेदवारी मिळाली त्यातून काल विकास आणि समृद्धी बाहेर पडले. आता कोण बनणार कॅप्टन्सीचे दोन उमेदवार? कोण बनणार घराचा नवा कॅप्टन? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आज बिग बॉस यांनी सदस्यांवर “युध्द्व कॅप्टन्सीचे” हे कॅप्टन्सी कार्य सोपवणार आहेत. बघूया काय होते या कार्यात. आणि बिग बॉस यांच्या पुढील आदेशापर्यंत किरण माने कॅप्टन म्हणून घराचा कार्यभार सांभाळतील असे देखील बिग बॉस यांनी जाहीर केले.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टास्क दरम्यान अपूर्वा आणि तेजस्विनीची शाब्दिक चकमक बघायला मिळणार आहे. अपूर्वा म्हणाली, एकच स्ट्रॅटेजी आहे आयुष्यभर डिस्ट्रॉय… तेजस्विनी म्हणाली, तोंड सांभाळ तुझं… अपूर्व म्हणाली, चिटर आहे चिटर तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. तेजस्विनी म्हणाली, हिडीस बाई दिसते आहे, गप्प बस. अपूर्वा म्हणाली, मी नाही त्यातली, कडी लाव आतली चल… बघूया हे भांडणं अजून किती पुढे गेलं ते आजच्या भागामध्ये.

Back to top button