चाकण : खुनाच्या घटनेतील संशयित निष्पन्न; तिघे जेरबंद | पुढारी

चाकण : खुनाच्या घटनेतील संशयित निष्पन्न; तिघे जेरबंद

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण येथील तरुणाच्या खूनप्रकरणी चाकण पोलिसांनी 12 जणांवर गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी मात्र अद्याप फरार आहे. मोन्या ऊर्फ मोनेश संजय घोगरे (वय 21, रा. चाकण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोनेशचा मित्र अमोल विश्वनाथ लाटूकर (वय 24, रा. एकतानगर, ता. खेड) याने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून शुभम म्हस्के, चेतन म्हस्के, चंदर ऊर्फ चंद्रकांत कुर्‍हाडे, रोहित कुर्‍हाडे, अर्जुन कुर्‍हाडे, हिर्‍या ऊर्फ आकाश चौधरी, किशोर धिवार, प्रणव जाधव, सोनू किसन डिंबळे (सर्व रा. खंडोबामाळ, चाकण), अर्जुन कुर्‍हाडे याचा मोठा भाऊ (नाव निष्पन्न नाही) व इतर तीन ते चार जणांवर खून, खुनाचा प्रयत्न, भारतीय शस्त्र कायदा आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

चेतन म्हस्के, चंदर ऊर्फ चंद्रकांत कुर्‍हाडे आणि सोनू किसन डिंबळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुमारे 12 जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये मोनेशचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना सोमवारी (दि. 21) रात्री 11 वाजेच्या दरम्यान चाकण येथील शिवसेना कार्यालयासमोर घडली होती.

Back to top button