Disha Salian चा मृत्यू घातपात नव्हे अपघात : सीबीआय | पुढारी

Disha Salian चा मृत्यू घातपात नव्हे अपघात : सीबीआय

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईमध्ये दोन वर्षांपूर्वी सुशांत सिंह रजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन(Disha Salian) चा मृत्यू झाला होता.  या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्‍यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता सीबीआयचं म्हणणं आहे की, दिशा सॅलियन हिचा मृत्यू केवळ अपघात आहे. त्यामध्ये कोणताही घातपात नसल्याचं सांगण्यात आलं आहे. (Disha Salian)

दिशा ही २८ वर्षांची होती. तिने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले होते. सीबीआयच्या अहवालामध्ये दिशा दारूच्या नशेमध्ये होती. अशावेळी मालाड येथील गॅलॅक्सी रिजेंड इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पाय घसरून ती खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हे दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध आहे का,  हे तपासले जात होते.  ८-९ जून २०२० च्‍या च्या रात्री दिशा इमारतीवरून कोसळली होती. त्यानंतर १४ जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपुतचा मृतदेह बांद्रा येथील त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दिशाचा मृत्यू झाल्यानंतर हा घातपात असल्याचं काहींचं म्हणणं होतं.

हेही वाचा : 

Back to top button